Pele's emotional message for Lionel Messi : रविवारचा दिवस फुटबॉल प्रेमींसाठी फार आनंदाचा दिवस होता. अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झालं. फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरूद्ध झालेल्या थरारक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये (Penalty Shootout) अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला. अर्जेंटीनाच्या या विजयानंतर ब्राझीलचा महान फुटबॉल प्लेअर पेले यांनी लिओनेल मेस्सीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्य म्हणजे पेले सध्या रूग्णालयात दाखल आहेत. तिथून त्यांनी फुटबॉलपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेले यांनी मेस्सीसोबत फ्रान्सचा खेळाडू कायलियन एम्बाप्पे याने फायनल सामन्यात हॅट्रिक मारल्याने शुभेच्छा दिल्या. श्वासासंबंधी त्रास होत असल्याने पेले सध्या रूग्णालयात भर्ती आहेत. 


कतारच्या Lusail Stadium मध्ये खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात अर्जेंटीनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने विजय मिळवल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. 90 मिनिटांनंतर अर्जेंटीना आणि फ्रान्स यांना एक्स्ट्रा टाईम देण्यात आला. यावेळी हा सामना 3-3 च्या बरोबरीत सुटला. ज्यानंतर पेनल्टीशूटआऊट करण्यात आलं.


पेले यांनी म्हटलंय की, फुटबॉलने आज पुन्हा एकदा रंजक पद्धतीने आपली कहाणी सांगितली आहे. मेस्सीने त्याचा पहिला वर्ल्डकप जिंकला, ज्यासाठी तो पूर्णपणे पात्र होता. माझा प्रिय मित्र एम्बाप्पेने फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटसह 4 गोल्स केले. खेळाच्या भविष्याच्या दृष्टीने कालचा सामना उत्तम होता. 


कालच्या फायनल सामन्यामध्ये कर्णधार लिओनेल मेस्सीने 2 गोल केले. पेले यांनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिला आफ्रिकन देश मोरोक्कोचंही अभिनंदन केलं. याशिवाय त्यांनी अर्जेंटिनाचा दिग्गज डिएगो मॅराडोनाचा देखील उल्लेख केलाय. पेलेंच्या म्हणण्याप्रमाणे 'अर्जेंटिनाचे अभिनंदन. डिएगो आता नक्कीच हसत असेल.


मेस्सीचा चाहत्यांना मोठा धक्का


अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.  या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अखेर मेस्सीने मौन सोडलं आहे. आपल्या लाडक्या मेस्सीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.


काय म्हणाला मेस्सी? 


विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर तो अर्जेंटिनातून निवृत्त होणार नाही.  मेस्सीने TyC स्पोर्ट्सला सांगितले की, ''तो अर्जेंटिनासाठी आणखी काही काळ खेळत राहण्याचा मानस आहे." , मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्त होणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळणे सुरू ठेवायचं आहे