Pele Health Update: ब्राझीलने (Brazil) आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप (Fifa World Cup) जिंकला आहे. ब्राझीलला या शिखरावर पोहोचवण्यात महान फुटबॉलर पेले (Pelé) हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे जगभरातील क्रीडाप्रेमी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता त्यांत्या प्रकृतीबाबत (Pele Health Update) माहिती समोर आली आहे. (Pele Health Update cancer has advanced say doctors and he will spend Christmas in hospital marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सरग्रस्त (Cancer) असलेल्या पेले यांची प्रकृती ढासळली असून त्यांना बुधवारी रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. किडनी आणि हृदय सुरळीत काम करत नसल्यानं अलबर्ट आईन्स्टाईन रूग्णालयात (Albert Einstein Hospital) त्यांना दाखल करण्यात आलंय. त्यानंतर त्यांना एलिव्हेटेड केअर हलवण्यात आलं. त्यामुळे यंदाचा ख्रिसमस (Christmas) त्यांना रुग्णालयात साजरा करावा लागणार आहे.


कोरोना झाल्यानंतर त्यांना (Pele) श्वसनाचा आजार जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांना काही दिवस रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. त्यांच्या आरोग्याविषयीची (Pele Health Update) माहिती आम्ही पुढच्या आठवड्यात देऊ, असं त्यांची मुलगी म्हणाली आहे.


आणखी वाचा - FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral


दरम्यान, सर्वांत कमी वयात गोल (Champion Pele) करण्याचा विक्रम, तसेच 1958, 1962 आणि 1970 असं तीन वेळा ब्राझीलचं नाव विश्वचषकावर कोरणारा खेळाडू. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पुर्ण करणारा फुटबॉलचा जादूगर (Wizard of football), अशी पेले यांची ओळख. 6 दशक झाली तरी आजही त्यांचं नाव सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळतंय.