Ben Stokes : क्रिकेटमध्ये सध्या वादाचा मुद्दा ठरतोय तो मंडकिंग (Mankading)...मंकडिंगद्वारे रन आऊट (Run out) करणं काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आणि तर काहींना ही पद्धत चुकीची वाटते. मग या मंकडिंग प्रकरणावर उपाय काय? दरम्यान या प्रश्नाचं उत्तर दिलंय चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज खेळाडू बेन स्टोक्स याने. मंकडिंगच्या प्रकरणासंबंधी असलेल्या वादांपासून बाहेर येण्यासाठी चेन्नईचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक उत्तम उदाहरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात शेवटच्या बॉलवर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शेवटचा रन काढण्यासाठी नॉन स्टायकर एंडवरून धावणाऱ्या फलंदाजाला रन आऊट करण्याचा आरसीबीच्या फलंदाजाकडून प्रयत्न करण्यात आला. यावेळी हर्षल पटेलने रवी बिश्नोईला मंकडिंगचा वापर करून बाद करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.


बेन स्टोक्सने दिली प्रतिक्रिया


या घटनेनंतर इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्सने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, रन मिळावा किंवा फायदा मिळवण्यासाठी फलंदाजाने लवकर क्रीज सोडल्यास त्यावेळी अंपायरने त्यावेळी दंड म्हणून 6 रन्स दिले पाहिजे. या पद्धतीमुळे फलंदाजांना वादाविना प्रकरणं सुटेल आणि ही गोष्ट थांबवता देखील येईल."



बेन स्टोक्सने त्याची ही प्रतिक्रिया कॉमेंट्रिटर हर्षा भोगले यांच्या ट्विटवर दिली आहे. दरम्यान स्टोक्सच्या या उपावर तज्ज्ञ काय मतं मांडतात हे पाहवं लागणार आहे. 


शेवटच्या ओव्हरमध्ये रंगला थरार


लखनऊ विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या सामन्यामध्ये अखेरच्या 4 ओव्हरमध्ये लखनऊला जिंकण्यासाठी 28 रन्सची गरज होती. त्यावेळी निकोलस पुरनने अवघ्या 18 बॉल्समध्ये 62 रन्सवर खेळत होता. सामना गमावणार असं वाटत असताना मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन यांनी सामना लखनऊच्या पाड्यात झुकवला.


या सामन्यात शेवटच्या 3 बॉलमध्ये आरसीबीला 2 रन्सची गरज होती. सामना 1 बॉल 1 रन पर्यंत गेला. शेवटच्या बॉलवर हर्षल पटेलने मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा डाव पूर्णपणे फसला. अंपायर्सने आरसीबीची अपील नाकारली. विकेटकीपर दिनेश कार्तिकने देखील अखेरच्या बॉल चुकीच्या पद्धतीने फेकला. अखेर आवेश खान आणि रवी बिश्नोईने विजयासाठी हवा असलेला एक रन पूर्ण करत आरसीबीचा पराभव केला.