मुंबई : बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वर्षभराच्या बंदीसोबतच त्यांचे आयपीएल खेळाचे दरवाजेही बंद झाले आहेत. काल स्मिथ जेव्हा जोहान्सबर्ग एअरपोर्टवर फ्लाइटसाठी आला तेव्हाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये माजी कॅप्टनला सुरक्षा रक्षक ज्यापद्दतीने नेत आहेत ते पाहता एखाद्या दहशतवाद्याला नेत असल्यासारखे दिसत आहे.  संपूर्ण एअरपोर्टवर चीटर, चीटर अशी ओरड ऐकू येत आहे. मीडियाचे कॅमेराही त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. तुला लोक चीटर म्हणतातय..तुझी काय प्रतिक्रिया आहे ? असे स्मिथला विचारले जात आहे. ही घटना एकदम फिल्मी वाटतेय. पण स्मिथ यावर एका शब्दानेही प्रतिक्रीया देत नाही. कोणाला प्रतिसाद न देता तो पुढे जात आहे.  ७ वर्षाच्या क्रिकेट करियरमध्ये कप्तानीपर्यंत पोहोचलेल्या स्मिथला ही मोठी शिक्षा झाल्याचे म्हटले जात आहे. 



स्मिथची कबुली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं.


तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.


अशी झाली बॉलशी छेडछाड


दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.


बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली.


सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला.


तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.