फुटबॉल: पेरूचा स्ट्राईकर गुएरेरोवर एक वर्षाची बंदी; फीफाचा निर्णय
अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवत गुएरेरोवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थातच 'फीफा'ने पेरूचा कर्णधार आणि स्ट्राईकर पाओलो गुएरेरोवर एक वर्षांची बंदी घातली आहे. अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवत गुएरेरोवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
फीफाने आपला निर्णय जाहीर करताना सांगितले की, 33 वर्षीय स्ट्राईकर गुएरेरोवर ऑक्टोबरमध्ये ब्यूनस आयर्स येथे अर्जेंटीना विरूद्ध खेळल्या गेलेल्या विश्वकप क्वालिफायर सामन्यात डोपिंग टेस्टमध्ये दोषी राहिल्याबद्दल निलंबित केले होते. त्यामुले गुएरेरो पेरूच्या वतीने न्यूजिलंडविरोधात झालेल्या प्लेऑफ सामन्यात खेळू शकला नव्हता.
फीफाने म्हटले आहे की, फीफाच्या शिस्तपालन समितीने गुएरेरोला डोपींग विरोधी नियम 6चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणात तो दोषी आढळला. त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. पेरूने 1982 नंतर पहिल्यांदाच पुढच्या वर्षी रशियात होत असलेल्या विश्वकपसाठी क्वालिफाय झाला आहे.