कतरिनाच्या मागे बसून आयपीएल मॅच बघणारा आता खेळतोय भारताकडून क्रिकेट
आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.
मुंबई : आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे. भारतानं २००७ साली टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर २००८ साली आयपीएलला सुरुवात झाली. आयपीएलच्या या ११ मोसमामध्ये क्रिकेट बदललं तसंच प्रत्येक टीमचे क्रिकेटपटूही बदलले. पण २००८ सालचा बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्यामागे बसलेला एक लहान मुलगा आता भारतीय टीममधला महत्त्वाचा सदस्य झाला आहे. २००८ साली बंगळुरूची मॅच बघण्यासाठी आलेला हा खेळाडू जसप्रीत बुमराह असल्याचं सांगितलं जात आहे.
२००८ साली बघितली मॅच
२००८ साली कतरिना कैफ ही बंगळुरूच्या टीमची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होती. त्यावेळी तिच्यामागे बसलेल्या बुमराहचा हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बुमराहही बंगळुरूच्या टीमची जर्सी घातलेला दिसत आहे. २००८ सालच्या या फोटोनंतर बुमराहनं २०१३ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. अजूनही बुमराह आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत आहे.
आयपीएलमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर बुमराहची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. भारतीय टीममध्येही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे बुमराह आता भारतीय टीमच्या तिन्ही फॉरमॅटचा महत्त्वाचा सदस्य आहे. काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमधून बुमराहनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.