मुंबई : केकेआरचा स्टार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana)चे नाव आज क्रिकेट विश्वात खूप मोठे आहे आणि चर्चेतही आहे. राणा हा मधल्या फळीचा मजबूत फलंदाज आहे. राणा आपल्या खेळांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. नितीश राणाची पत्नी सांची मारवाहही अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांची जोडी खूप सुंदर दिसते.



नितीश राणाची पत्नी सांची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहेत. नितीश आणि सांची यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता.



नितीश त्याच्या खेळामुळे खूप प्रसिद्ध आहे. पण त्याची पत्नी सांची मारवाह बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सांचीची कारकीर्द 2015 मध्ये सुरू झाली.



सांची मारवाहने सुशांत स्कूल ऑफ डिझाईन, अंसल युनिव्हर्सिटीच्या विद्याशाखेतून शिक्षण घेतले आहे. सांचीने अनेक नामवंत इंटीरियर डिझायनर्सकडून प्रशिक्षणही घेतले आहे.



या जोडप्याने या मुलाखतीत असेही सांगितले की अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन दोघांमध्ये भांडण होते. नितीश राणा म्हणाले की आमच्या खोलीत एक लहान उशी आहे, सांची आणि मी अनेकदा त्या उशावरून भांडतो की दोघांपैकी कोण त्या उशीवर झोपेल.