Asia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?
IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
Asia cup 2023 timetable : लाहोरच्या मैदानात खेळलेल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला आहे. धाकधूक वाढवणाऱ्या या सामन्यात फिरकीच्या जोरावर श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
ग्रुप स्टेजमधून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 साठी क्वालिफाय केलंय. सुपर-4 मध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहे. 4 संघ एकमेकांशी भिडतील. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुपर 4 मधील सामने-
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) - 6 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) - 9 सप्टेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) - 10 सप्टेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) - 12 सप्टेंबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) - 14 सप्टेंबर
भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) - 15 सप्टेंबर
फायनल सामना - 17 सप्टेंबर
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
श्रीलंकाचा संघ : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (क), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा, मथीशा पाथिराना.
बांग्लादेशचा संघ : मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मुशफिकुर रहीम (WK), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, हसन महमूद.