मुंबई : क्रीडा विश्वातून (Sports News) मोठी बातमी समोर आली आहे. प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabbadi  Final 2022) अंतिम सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्स (jaipur pink panthers) चॅम्पियन ठरला आहे. जयपूरने अंतिम सामन्यात पुण्यावर (Puneri Paltan) 4 पॉइंट्सने विजय मिळवला आहे. यासह जयपूर दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली आहे. जयपूरने पुण्यावर 33-29 अशी मात केली. (pkl pro kabaddi final 2022 jaipur pink panthers win to 33 29 against puneri paltan and win 2nd time title)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणेरी पलटणची ही अंतिम सामन्यात पोहचण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे पलटणसमोर चॅम्पियन राहिलेल्या जयपूरचं तगडं आव्हान होतं. मात्र पुण्याने जयपूरचा चांगला सामना केला. असलम इनामदार आणि मोहित गोयत ही हीट रेडर जोडी उपलब्ध नसल्याचा मोठा फटका पुण्याला बसला. परिणामी पुण्याचं स्वप्न भंगलं.



जयपूर दुसऱ्यांदा चॅम्पियन


दरम्यान जयपूरची चॅम्पियन होण्याची ही पहिली वेळ ठरली आहे. याआधी  जयपूरने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच हंगामात म्हणजेच 2014 साली यू मुंबावर 35-24 असा विजय मिळवला होता.


जयपूरवर बक्षिसांचा वर्षाव


दरम्यान जयपूरवर विजयानंतर कौतुकाचा वर्षाव होतोय. आता जयपूरला चॅम्पियन ठरल्याने 3 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आलं आहे. तर उपविजेत्या पुण्याला  1 कोटी 80 लाख रुपयांची विजयी राशी देण्यात आली. तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी 90 लाख रुपये मिळाले आहेत.तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरच आव्हान संपुष्टात आलेल्या संघालाही प्रत्येकी 45 लाख रुपये देण्यात आले आहेत.