IPL 2020: बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी, बनला पर्पल कॅपचा दावेदार
बुमराह पर्पल कॅपच्या स्पर्धेत...
मुंबई : जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये केली जाते. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सध्याच्या हंगामात त्याची भीती फलंदाजांमध्येही दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध त्याने आज उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने आज एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. आज त्याने त्याचाच एक रेकॉर्ड मोडला आहे. 4 ओव्हरमध्ये 17 धावा देऊन त्याने 3 गडी बाद केले. यापूर्वी 2017 मध्ये, बुमराहने 20 विकेट घेतल्या, ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
दिल्लीविरुद्धच्या 12 व्या ओव्हरमध्ये बुमराहने प्रथम मार्कस स्टोईनिसला बाद केले, त्यानंतर ऋषभ पंतला चालतं केलं. ही त्याची 21 वी आणि 22 वी विकेट ठरली. इतकेच नव्हे तर आयपीएमधील ही त्याची सहावी डबल विकेट आहे, जो एक विक्रम आहे. यानंतर त्याने 14 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हर्षल पटेल (5) ची विकेट घेतली. त्याने आज रबाडाच्या 23 विकेटची बरोबरी केली आणि पर्पल कॅपसाठी दावेदार बनला.
कोणत्या मोसमात किती विकेट्स?
23 विकेट: 2020
20 विकेट: 2017
19 विकेट: 2019
17 विकेट: 2018
15 विकेट: 2016
आयपीएल 2020 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कीरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातही रोहित शर्मा खेळत नाहीये. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे.