Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 106 रन्सने विजय मिळवला. जोहानिसबर्गच्या या मैदानात झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सिरीजमध्ये बरोबरी केली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम शतक ठोकलं. दरम्यान सामना जिंकल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सूर्या काय म्हणालाय ते पाहूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर मुलाखत देताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, मनात कोणतीही भीती न ठेवता मला क्रिकेट खेळायचंय. हे वक्तव्य केल्यानंतर सूर्याने रोहित शर्माला टोमणा मारल्याचं सोशल मीडियावर बोललं जातंय. 


सूर्यकुमार यादव म्हणाला की, जिंकण्याचा अनुभव नेहमी आनंददायी असतो. मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही शतक करता आणि तुमची टीम विजयी होते, तेव्हा तुम्ही जास्त खुश होता. मनात कोणतीही भीती न बाळगता क्रिकेट खेळायचं आहे. आमची रणनिती हीच होती की, आम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायला मिळेल. जेणेकरून आम्ही मोठा स्कोर उभा करू शकू. 


सूर्याने केलं कुलदीप यादवचं कौतुक


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कुलदीप यादवची कामगिरी उत्कृष्ट झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर कहर करत त्याने एकूण पाच विकेट्स घेतल्या. त्याने 14व्या ओव्हर्समध्ये त्याने 3 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने कुलदीप यादवचे भरभरून कौतुक केले. 


सूर्या पुढे म्हणाला की, कुलदीप त्याच्या कामगिरीवर कधीच समाधानी नसतो. तो विकेट्ससाठी भुकेलेला आहे. तो आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्वत:ला एक मोठी भेट दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तुमचा खेळ जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 


सूर्यकुमार यादवची कॅप्टन्स इनिंग


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या विजयामध्ये सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या तुफान शतकामुळे टीमला मजबूत धावसंख्या गाठणं शक्य झालं. सूर्यकुमार यादवच्या 100 रन्सच्या खेळीच्या जोरावर भारताने 202 रन्सचं लक्ष्य ठेवलं. त्याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम अवघ्या 95 रन्सवर आटोपली. शतकी खेळीमुळे सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.