Player Who Ruled Out IND vs AUS ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये नुकतंच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात आली होती. ही टेस्ट सीरिज टीम इंडियाने (Team India) 2-1 अशा फरकाने जिंकली. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळायची आहे. मात्र ही सीरिज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.


टीम इंडियाच्या कोचकडून मोठी माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सीरीज सुरु होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. टीम इंडियाचे कोट टी. दिलीप (T. Dilip) यांनी अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली, तेव्हा ते म्हणाले, दुखापत हा आपल्या खेळाचा हिस्सा आहे. आमच्याकडे बेस्ट मेडिकल टीम असून आम्ही याबबात नॅशनल क्रिकेट अकॅडमीसोबक संपर्कात आहोत. श्रेयस अय्यर पूर्ण सिरीजच्या बाहेर गेला आहे. 


अय्यरच्या जागी टीममध्ये कोणाला संधी? 


टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. यामध्ये श्रेयस दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये, मात्र अद्याप तरी त्याच्या जागी कोणा दुसऱ्या खेळाडूला टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. 


चौथ्या टेस्टसाठी फलंदाजीलाही उतरला नाही श्रेयस


चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी रविवारी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठदुखीची तक्रार जाणवली. त्याचवेळी त्याने फलंदाजीला न येण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. यावेळी त्याला स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याला वनडे सिरीजमधून वगळण्यात आलं आहे. 


दोन्ही संघांचे मिळून 5 खेळाडू वनडेतून बाहेर


  • रोहित शर्मा

  • श्रेयस अय्यर

  • पॅट कमिन्स

  • जॉश हेझलवूड

  • झे रिचर्डसन


ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडियाची वनडे स्क्वाड


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मो. शमी, मो. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट