मुंबई : आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबर म्हणजे येत्या रविवारपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक विक्रम रचले जातील, नवे विक्रम स्थापन होतील. पण याआधी आम्ही तुम्हाला एक रोचक रेकॉर्ड सांगणार आहोत. लीगमध्ये शून्यावर बाद झालेल्या सर्वाधिक खेळाडूंचा हा विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक बाद होण्याचा विक्रम पाच खेळाडूंच्या नावावर आहे.

 

या यादीत भारताच्या दिग्गज खेळाडूंचं नाव आहे. हिटमॅन रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंह, पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू या फलंदाजांचा यात समावेश आहे. हे पाचही खेळाडू तब्बल तेरा वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. आता यापैकी पार्थिक पटेलने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. उरलेले चार खेळाडू दुसऱ्या हंगामात खेळताना दिसणार आहेत. 

 

त्यामुळे  रोहित शर्मा , अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यापैकी एकही खेळाडू शुन्यावर बाद झाल्यास नकोसा विक्रम त्यांच्या नावावर होईल. असं असलं तरी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 207 सामन्यांमध्ये 5480 धावा जमा आहेत. 

 

याशिवाय लीगमधील 4 खेळाडू प्रत्येकी 12 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यामध्ये पियुष चावला, मनदीप सिंग, मनीष पांडे आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकचा नंबर येतो. हे दोन्ही खेळाडू खाते न उघडता 11 वेळा शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

 

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू

 

हरभजन सिंग  163 मॅच 13 वेळा शुन्यावर बाद

 

पार्थिव पटेल 139 मॅच 13 वेळा शुन्यावर बाद

 

अजिंक्य रहाणे 151 मॅच 13 वेळा शुन्यावर बाद

 

अंबाती रायडू 166 मॅच 13 वेळा शुन्यावर बाद

 

रोहित शर्मा 207 मॅच 13 वेळा शुन्यावर बाद

 

पियुष चावला 164 मॅच 12 वेळा शुन्यावर बाद

 

मनदिप सिंग 104 मॅच 12 वेळा शुन्यावर बाद

 

मनिष पांडे 151 मॅच 12 वेळा शुन्यावर बाद

 

गौतम गंभीर 154 मॅच 12 वेळा शुन्यावर बाद