पंतप्रधान मोदींनी स्वीकारले विराटचे चॅलेंज
देशात फिटनेसबाबत जागरुकता करण्यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
मुंबई : देशात फिटनेसबाबत जागरुकता करण्यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात राठोड यांनी खेळ आणि सिनेमा जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग करत या अभियानात सामील होण्यास सांगितले होते. या व्हिडीओला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.राठोड यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही चॅलेंज दिले होते. विराटनेही हे चॅलेंज स्वीकारले होते. तो म्हणाला, मी हे चॅलेंज स्वीकारतो. मात्र त्याबरोबरच मी माझी पत्नी अनुष्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाऊ धोनीला हे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन करतो.
विराट कोहलीने दिलेले हे चॅलेंज पंतप्रधान मोदींनी स्वीकारले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलेय, विराटचे चॅलेंज मी स्वीकारतो. मी लवकरच याबाबतचा व्हिडीओ शेअर करुन फिटनेस चॅलेंज शेअर करेन.
राठोड यांनी काही दिवसांपूर्वी हम फिट तो इंडिया या हॅशटॅगने फिटनेस चॅलेंजला सुरुवात केली होती. ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत ते आपल्या ऑफिसमध्येच वर्कआऊट करत असल्याचे दिसले होते. त्यांनी याबाबत आपल्याला पंतप्रधान मोदींनीकडून उर्जा मिळत असल्याचे म्हटले होते. जेव्हा मी पंतप्रधान मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून प्रेरित होतो. त्यांच्यात जबरदस्त उर्जा आहे. ते दिवस रात्र काम करतात. संपूर्ण भारत फिट व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्यामुळेच मी प्रेरित होऊन हा व्हिडीओ बनवलाय.