नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. हा धोका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भारतातील नागरिकांना संबोधित करत असताना रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. 22 मार्चला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू असणार आहे. फक्त भारतीयच नाही तर विदेशातील व्यक्ती देखील याच्या समर्थनात आले आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसन याने देखील भारतीयांना संदेश दिला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिकेट फॅन्सकडून देखील पीटरसनच्या या आवाहनाचं स्वागत होत आहे. पीटरसनला वाटतंय की भारताच्या लोकांनी सुरक्षित राहावं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केविन पीटरसन (Kevin Pietersen) ने हिंदीमध्ये ट्विट करत भारतीय जनतेला आवाहन केलं आहे. पीटरसनने म्हटलं की, "नमस्ते इंडिया, आपण सगळे कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी एकत्र आहोत. आपण सगळ्यांना आपल्या सरकारच्या आवाहनाचं पालन केलं पाहिजे. घरात काही दिवस राहिलं पाहिजे. ही वेळ सतर्क राहण्याची आहे. तुमच्या सर्वांना खूप प्रेम. माझे हिंदी टीचर श्रीवत्स गोस्वामी आहेत."


पीटरसनच्या या ट्विटला पंतप्रधान मोदींनी देखील उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'विस्फोटक बॅट्समन ज्याने टीमला संकटात पाहिलं आहे. त्यांच्याकडे आम्हाला सांगण्यासाठी काही आहे. कोविड 19 च्या विरोधात आपण एकत्र येत लढाई लढूया.'



पीटरसनने यानंतर पुन्हा ट्विट करत म्हटलं की, "धन्यवाद मोदी जी, तुमचं नेतृत्व ही खूप विस्फोटक आहे." मोदी यांनी आपल्या या ट्विटमध्ये विराट कोहली, शिखर धवन, अजिक्य रहाणे आणि सुरेशा रैना यांना टॅग केलं आहे. संदेश स्पष्ट आहे की, सगळे मिळून कोरोनाच्या विरोधात लढायचं आहे.