मुंबई : आयपीएलच्या सामन्याला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिले तीन सामने झाले असून निकाल खूपच वेगळे आहेत. या निकालामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला धक्का बसला आहे. कारण गेल्या हंगामात सर्वात उत्तम टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिन्ही संघांपैकी एकही संघ पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाबने दमदार सुरुवात केली. यासोबत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या तीनमध्ये कोण आहे जाणून घेऊया. 


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आणि पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या स्थानावर पंजाब आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता संघ आहे. दिल्ली संघाने कोलकाता संघाला 4 विकेट्सनं पराभूत केलं होतं. 


दिल्ली संघाला 2 पॉईंट मिळाले त्याच सोबत +0.914 रनरेट असल्याने पॉईंट टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे. तर पंजाबचा रनरेट +0.697 आहे त्यामुळे दुसऱ्या स्थानवर पंजाब संघ आहे. 


पहिल्याच सामन्यात फाफ ड्यु प्लेसीसने 88 धावांची मजल मारली. शतक करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं मात्र सुरुवातीलाच ऑरेंज कॅपवर फाफने आपलं नाव कोरलं आहे. फाफच्या मागे स्पर्धेत शान किशन (81) तर महेंद्रसिंह धोनी  (50) आहेत. 


पर्पल कॅपच्या स्पर्धेत कुलदीप यादव सगळ्यात पुढे आहे. त्यापाठोपाठ ब्रावो आणि थम्पी आहेत. यंदाचे सामने खूपच चुरशीचे सुरू आहेत. बंगळुरू संघ 200 हून अधिक धावा करूनही सामना हरली आहे.