Points Table equation: रविवारी धरमशालाच्या मैदानावर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने न्यूझीलंडच्या टीमचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानंही गाठलं आहे. मात्र या विजयाचा फायदा टीम इंडियाला खरंच झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नाही. होय, न्यूझीलंडविरूद्धच्या विजयाचा शून्य फायदा टीम इंडियाला झालाय, कसं ते पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची घौडदौड सुरुच आहे. न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळवून टीम इंडियाने या स्पर्धेत सलग 5 वा विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात 20 वर्षानंतर पहिला विजय ठरलाय. यामुळे टीम सेमीफायनल गाठण्याच्या एक पाऊल पुढे आली आहे. 


जिंकूनही तोट्यात कशी काय टीम इंडिया?


न्यूझीलंडविरूद्धचा सामना जिंकून टीम इंडियाने पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं. टीम इंडियामुळे न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. विजयामुळे टीम इंडियाला जिंकल्यामुळे 2 पॉइंट्स मिळाले. मात्र या पॉइंट्सशिवाय टीम इंडियाच्या हाती दुसरं काहीच मिळालं नाही. उलट टीम इंडियाचा तोटाच झालाय.


न्यूझीलंड विरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचं नेट रनरेट हा कमी झाला आहे. हा सामना होण्यापूर्वी टीम इंडियाचं नेट रनरेट चांगलं होतं. मात्र या सामन्यानंतर ते कमी झालं आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी जेव्हा दोन्ही टीमचे पॉईंट्स सारखे असतात, त्यावेळी नेट रन रेटच्या माध्यमातून निकष लावला जातो. त्यामुळे टीम इंडियाला जिंकूनही एका प्रकारे हा तोटाच आहे. कारण पहिल्यापेक्षा टीमचं नेट रनरेट खाली आलं आहे. नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे.


टीम इंडिया-न्यूझीलंडच्या सामन्याअगोदर


  • न्यूझीलंड नेट रन रेट | +1.923

  • टीम इंडिया नेट रन रेट | +1.659


न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीमचं नेट रनरेट


  • न्यूझीलंड नेट रन रेट | +1.481

  • टीम इंडिया नेट रन रेट | +1.353


20 वर्षांनंतर टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा पराभव


20 वर्षांनंतर आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ( Team India ) हा विजय आहे. याआधी 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करण्यात यश आलं होतं. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय टीमवर सातत्याने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र यावेळी टीम इंडियाने ( Team India ) धर्मशालाच्या मैदानावर शानदार विजय मिळवत हा विक्रम मोडीत काढला आहे. आता टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याकडे लक्ष असणार आहे.