नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली हा नंबर एकचा खेळाडू मानला जातो. तो तेवढाच यशस्वी कॅप्टनही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. पण त्याचा राग करणारेही काही कमी नाहीत हेही वेळोवेळी दिसून आलयं.


दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने कोहलीला विदूषक म्हणून हिणवल्याचे समोर आले आहे. 


कोहली आणि रबाडामध्ये 'तूतूमैमै'


टेस्ट मालिकेत पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाने वन डे आणि टी २० मध्ये आफ्रिकेचा धुव्वा उडविला.


दरम्यान आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडा आणि कोहलीमध्ये झालेली तूतूमैमै संपूर्ण दौऱ्यामध्ये चर्चेचा विषय ठरली. काही कारणामुळे या दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली.


पण यामध्ये आयसीसीने रबाडाला दोषी ठरविले आणि त्याच्यावर २ सामन्यांची बंदी घालण्यात आली.  


ट्विटरवर पोस्ट 


दरम्यान, आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल हॅरिस याने या प्रकारावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्याने पोस्ट लिहिली आहे.


कोहलीचे वर्तन विदुषकासारखे 


आफ्रिका दौऱ्यात कोहलीचे वर्तन विदुषकासारखे होते पण त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.


असे असताना आयसीसीला रबाडाच्या वर्तणुकीतच समस्या दिसली असा टोलाही हॅरिस याने लगावला आहे.