मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला जरी उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले असले तरी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे विधानसभेत गोंधळाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी करून उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचा आज विधानसभेत गौरव करण्यात आला. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महिला क्रिकेट संघाच्या अभिनंदन केलं. शिवाय संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडू पूनम राऊत, स्मृती मानधाना आणि मोना मेश्राम या तिघींना प्रत्येकी पन्नास लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्य सरकारच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


भारतीय महिला संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करताना फायनलमध्ये मजल मारली होती. पूनम राऊतने फायनलमध्येही ८६ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि अवघ्या ९ धावांनी भारताला पराभव पत्करावा लागला.