नवी दिल्ली : प्रेमाला ना वयाचं बंधन असतं, ना इतर कोणत्याही गोष्टीचं. जीवनात प्रेमात असणाऱ्या व्यक्ती भरभरुन या भावनेचा आनंद घेतात, त्या भावनेशी एकरुप होतात आणि एकमेकांच्या जीवनाच्या प्रवासात मोलाचा वाटा उचलतात. अशाच एका नात्यानं सध्या संपूर्ण सेलिब्रिटी वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोर्तुगाली मोटरसायकल रेसर मिगुएल ओलिवेरा (Miguel Oliveira) यानं त्याची सावत्र बहीण आंद्रिया पिमेंटा (Andreia Pimenta) हिच्याशी लग्नबंधनात अडकत एका नव्या नत्याची सुरुवात केली आहे. वयाच्या 13 व्या वर्षापासून हे दोंघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत. गेली 11 वर्षे त्यांनी आपलं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं ज्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच या नात्याचा अधिकृत स्वीकार केला होता. 


माध्यमांध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार आंद्रिया पिमेंटा ही मिगुएल ओलिवेराचे वडील पाओलो यांची दुसरी पत्नी क्रिस्टीना यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर लग्नासंदर्बातील एक फोटो पोस्ट करत या जोडीनं नात्याच्या या नव्या टप्प्याची माहिती सर्वांनाच दिली. 




लग्नाच्या बातमीसोबतच मिगुएलनं आपली पत्नी आंद्रिया गरोदर असल्याची गोड बातमीही दिली. ही बातमी देताना त्यानं अल्ट्रासाऊंड स्नॅपही शेअर केला. मागच्य़ा वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये या जोडीनं साखरपुडा करत लग्नासाठीचं एक पाऊल उचललं होतं. ज्यावेळी त्याच्या वडिलांनीही या बातमीवर आनंदाची प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची बातमी देणाऱ्या या जोडीवर सध्या सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत असून, या लग्नाबाबत कुतूहलही व्यक्त करण्यात येत आहे.