अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या खेळाडूला भाग घेण्याची संधी मिळू शकते. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आगामी सीजनमध्ये फास्ट बॉलर अली खान (Ali Khan)ला घेऊ इच्छित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेली केकेआरने इंग्लंडचा फास्ट बॉलर हॅरी गर्ने (Harry Gurney) च्या जागी खानची निवड केली आहे. पण अजून आयपीएल मॅनेजमेंटकडून परवानगी मिळालेली नाही. गर्नेच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याचं ऑपरेशन करावं लागलं. ज्यामुळे त्याने आयपीएल आणि इंग्लंडच्या वाइटलिटी ब्लास्ट लीगमधून आपलं नाव परत घेतलं.


अली खान ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) टीमचा भाग होता. ज्यांनी गुरूवारी कॅरेबियाई प्रीमियर लीग जिंकली. 8 सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट घेतले. अली खानने 2018 कनाडा ग्लोबल टी-20 मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती.


राजस्थान रॉयल्सचा माजी बॉलर रस्टी थेरॉन (Rusty Theron), जो सध्या अमेरिकेसाठी खेळतो. तो 2011 मध्ये डेक्कन चार्जर्स आणि 2010 मध्ये किंग्स इलेवन पंजाबकडून खेळला आहे. थेरॉन 2015 मध्ये राजस्थान रॉयल्सशी जुडला. पण 2019 मध्ये तो दक्षिण आफ्रिका सोडून अमेरिकेला गेला.