सेमीफायनलमध्ये भारत आणि या संघामध्ये होऊ शकतो सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीतच्या रोमांचक अंतिम फेरीत कोण जातं याबाबत उत्सूकता कायम आहे. आतापर्यंत अतिशय मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. पण केवळ इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. `अ` गटात मात्र चुरशीची लढाई आहे. आज ऑस्ट्रेलिया जर हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल.
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीतच्या रोमांचक अंतिम फेरीत कोण जातं याबाबत उत्सूकता कायम आहे. आतापर्यंत अतिशय मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत. पण केवळ इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 'अ' गटात मात्र चुरशीची लढाई आहे. आज ऑस्ट्रेलिया जर हारला तर तो या स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल.
उर्वरित दोन सामन्यांमध्ये 'ब' गटातमध्ये भारत, पाकिस्तान, आफ्रिका, श्रीलंका यांच्यात चुरस आहे. आता जो संघ हारेल तो स्पर्धेतून बाहेर होऊन जाईल. भारत आणि आफ्रिकेमध्ये ११ जूनला तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात १२ जूनला लढत होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे देखील समोर आलं आहे की, सेमीफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसोबतही सामना होऊ शकतो. पण यासाठी अट अशी असणार आहे की, भारताने आफ्रिकेचा पराभव करावा आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा. यामुळे 'अ' गटात भारत पहिल्या स्थानावर येईल. तर बांगलादेश तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर येईल.