कोलकाता : टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेला स्पिनर प्रग्यान ओझा याच्यात आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात कोल्डवॉर सुरुच असल्याचं दिसत आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएबी म्हणचेच बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रग्यान ओझासोबत संपर्क होऊ शकत नाहीये. त्यामुळेच १७ सप्टेंबरपासून गुजरात विरोधात खेळल्या जाणाऱ्या दोन वॉर्म-अप मॅचसाठी प्रज्ञानचा समावेश न करताच बंगालच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.


गेल्या दोन रणजी सीजन दरम्यान बंगालच्या टीमसाठी खेळणाऱ्या प्रग्यान ओझाला आता हैदराबादला परतायचं आहे. मात्र, प्रज्ञानला सीएबीकडून नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) मिळू शकलेली नाहीये. 


सीबीएचे जॉईंट सेक्रेटरी अभिषेक डालमिया यांनी सांगितले की, प्रग्यान ओझासोबत अद्याप आम्ही संपर्क करु शकलेलो नाहीत आणि त्यामुळेच त्याच्याशिवाय टीम जाहीर करावी लागली.


प्रग्यान ओझा नेमका कुठं आहे यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये. त्याने कोच साईराज बहुतुले यांच्या नेत्रृत्वात झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभाग घेतलेला नाहीये. 


दरम्यान, श्रीवत्स गोस्वामीच्या नेत्रृत्वात १७ सदस्यांची टीम सूरतमध्ये १ चार दिवसीय आणि १ तिन दिवसीय मॅचमध्ये सहभागी होणार आहे.