मुंबई : प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. 


का दिला राजीनामा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मधील दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या टॅलेंट हंटच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे माजी खेळाडू  प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा एमसीए अध्यक्ष आशिष शेलार यांना पाठविला आहे.


काय म्हणाले अमरे?


दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या टॅलेंट हंटच्या प्रमुखपदी माझी नुकतीच निवड झाल्यामुळे मी माझ्या व्यवस्थापकीय समिती सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. पदाचा राजीनामा देण्याचे हेच कारण असल्याचे अमरे यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.


फायद्याचे पद असू नये


जस्टीस लोढा समितीच्या शिफारशीनुसार फायद्याचे पद असू नये अशी शिफारस आहे. त्यामुळे कोणत्याही नियमाचे उल्लंघन होऊ नये याकरता मी या पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या व्यवस्था पकीय समितीच्या बैठकीत अमरे यांचा राजीनामा स्विकारला जाण्याची शक्यता, असल्याचे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले. प्रवीण अमरे यांनी अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर यांना मार्गदर्शन केले आहे.