मुंबई : टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला वन-डे सीरिजमध्येही धुळ चारण्यास सज्ज आहे. धर्मशाला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली वन-डे रंगणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर रोहित शर्माकडे भारतीय टीमची धुरा सोपवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन-डेमध्ये अव्वल स्थान काबीज करण्यासाठी टीम इंडियाला वन-डे सीरिजमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश द्यावा लागणार आहे. सीरिजमधील पहिली वन-डेत धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदनावर होणार आहे.


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टीमला रोखण्याचं मोठं आव्हान श्रीलंकन टीमसमोर असेल. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर लंकन टीमला वन-डेत कमबॅक करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत. भारतीय टीमची ओपनिंगची भिस्त ही रोहित शर्मा आणि शिखर धवनवर असेल. 


तर टेस्टमध्ये आऊट ऑफ फॉर्म असलेल्या अजिंक्य रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारकडे फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. हार्दिक पंड्याच्या येण्यानं भारताची मिडल ऑर्डर आणखी मजबूत झालीय. तर महेंद्रसिंग धोनीकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. 


दुसरीकडे लंकन टीमसमोर भारतीय टीमचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असेल. भारतीय टीमनं लंकेचा त्यांच्याच भूमीत ५-० नं धुव्वा उडवला होता. आता याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल.