मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. आयसीसीने या  टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दूबईत केलंय. कोरोनामुळे वर्ल्ड कप यूएईत खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार आहे. या वर्ल्ड कपसाठी प्रत्येक खेळाडू जोरदार मेहनत करतोय. श्रीलंका विरुद्धची टी 20 मालिका ही टीम इंडियाच्या दृष्टीने वर्ल्ड कपची रंगीत तालीम आहे. पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. पृथ्वीच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या बी संघाचा कर्णधार शिखर धवनसमोर आव्हान मजबूत आव्हान आहे. तसेच शिखरचा पत्ता कटही होऊ शकतो. (Prithvi Shaw's challenge in front of Shikhar Dhawan for the upcoming T20 World Cup)
    
बीसीसीआय टी 20 वर्ल्ड कपसाठी मजबूत संघ उतरवणार आहे. यामध्ये तोडीसतोड खेळाडूंचा समावेश असेल. सामना एकहाती जिंकवून देणाऱ्या खेळाडूंना निवड समिती प्राधान्य देईल. त्यामुळे शिखर धवनचा पत्ता कट होऊ शकतो, अशी क्रीडा वर्तुळात चर्चा आहे. शिखरचा स्ट्राईक रेट विशेष चांगला नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी प्रबळ दावेदार


पृथ्वी शिखरचा पत्ता कट करु शकतो. पृथ्वी सध्या जोरदार कामगिरी करतोय. पृथ्वी हा सलामीवीर या स्थानासाठी  प्रबळ दावेदार मानला जातोय. पृथ्वीने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात अफलातून कामगिरी केलीय.तसेच त्याआधी आपल्या नेतृत्वात त्याने मुंबईला विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे पृथ्वीने शिखरसमोर सलामीच्या जागेसाठी कडवं आव्हान दिलंय. त्यामुळे पृथ्वीमुळे शिखरची जागा धोक्यात येणार की आणखी काही होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.