भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून (Mumbai's Ranji Trophy squad) वगळण्यात आलं आहे. फिटनेस आणि शिस्तबद्धतेवरुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यादरम्यान पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर चार शब्दांची एक पोस्ट शेअर केली आहे. . संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉला संघाबाहेर काढण्याची कारणं जाहीर केलेली नाहीत. मात्र माहितीनुसार, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते पृथ्वी शॉवर अनेक गोष्टींवरुन नाराज आहेत. यामध्ये वाढलेलं वजन, बेशिस्तपणा तसंच नेटमध्ये नियमितपणे सरावाला हजेरी न लावणं यांचा समावेश आहे. संजय पाटील (अध्यक्ष), रवी ठाकर, जितेंद्र ठाकरे, किरण पोवार आणि विक्रांत येलिगेटी यांचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवड समितीने किमान एका रणजी ट्रॉफी सामन्यासाठी पृथ्वी शॉला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.


'वाढलेलं वजन, बेशिस्तपणा,' पृथ्वी शॉला धडा शिकवण्यासाठी MCA चा मोठा निर्णय; थेट बाहेरचा दाखवला रस्ता


 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये त्याने 'विश्रांती हवी होती, थँक्स' (Need a break thx) असं लिहिलं आहे. सोबत त्याने हसतानाचा इमोजीही शेअर केला आहेत. मुंबई रणजी ट्रॉफीतून वगळण्याचा निर्णय येण्याच्या काही वेळ आधीच त्याने ही पोस्ट केली. 


10 मिनिटं आधी टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमधून का वगळलं? संजू सॅमसनचा पहिल्यांदाच खुलासा, 'रोहितने मला टॉसच्या आधी...'


 


Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉचा बेशिस्तपणा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी डोकेदुखी ठरत होता. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला पृथ्वी शॉला रणजी संघातून बाहेर काढवून धडा शिकवण्याची इच्छा आहे. पृथ्वी शॉ नेट प्रॅक्टिसला नेहमी उशिरा येणं संघ व्यवस्थापनासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. रिपोर्टनुसार, तो नेट प्रॅक्टिसला अजिबात गांभीर्याने घेत नाही, तसंच नियमितपणे हजेरी लावत नाही. अनेकांनी त्याच्याकडे शिस्तीचा अभाव असून, वाढलेलं वजन चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. 


श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि अगदी कर्णधार अजिंक्य रहाणे सारखे दिग्गज क्रिकेटपटू सराव सत्राच्या बाबतीत नियमितपणे हजर असतात. दुसरीकडे, शॉ स्वस्तात बाद होऊनही काही सत्रं  चुकवतो. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, शॉला वगळण्याचा निर्णय केवळ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचा नव्हता. कर्णधार आणि प्रशिक्षकही त्याला संघातून बाहेर ठेवण्यास उत्सुक होते.


पृथ्वी शॉकडे प्रतिभा असली तरी मैदानाबाहेरील समस्या आणि दुखापतींमुळे त्याची कारकीर्द विस्कळीत झाली आहे. रणजी करंडक आणि दुलीप ट्रॉफी पदार्पणात शतक झळकावणारा सचिन तेंडुलकरनंतर तो एकमेव खेळाडू आहेत. शॉने आपल्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले आणि तेंडुलकरनंतर तो सर्वात तरुण भारतीय ठरला. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला.


तथापि, पहिल्या सामन्यानंतर त्याची कामगिरी झपाट्याने घसरली. ऑक्टोबर 2018 पासून त्याने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. शॉ दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएलमध्ये नियमित खेळत असताना, त्याच्या खराब कामगिरीमुळे 2024 च्या हंगामात काही सामन्यांसाठी वगळण्यात आलं. आता 2025 च्या लिलावापूर्वी दिल्ली त्याला कायम ठेवणार नाही असं सांगितलं जात आहे.