Prithvi Shaw selfie row: आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) सिझनला सुरुवात झाली असून गुजरात टायटन्स सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमचा खेळाडू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अडचणींमध्ये काहीशी वाढ झालेली दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत बाचाबाची झाल्यामुळे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चर्चेत आला होता. सपना गिल (Sapna Gill) असं या इन्फ्लुएंसरचं नाव असून हिने पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव विरोधात तक्रार केली आहे. 


पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपना गिलने बॅटने मारहाण आणि विनयभंगासह काही प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम 354, 509, 324 अंतर्गत तक्रार दाखल केलीये. यावेळी सपनाने सरकारी रुग्णालयाची मेडिकल सर्टिफिकेट देखील दिलीयेत. आजतकने दिलेल्या बातमीनुसार, ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 


पुढील सुनावणी कधी?


मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलने एक तक्रार केली असून ही तक्रार एयरपोर्ट पोलीस स्टेशन ऑफिसर सतीश कवंरकर आणि भगवत गरांदे यांच्या विरोधात आहे. या तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची सुनावणी आता 17 एप्रिल रोजी होणार आहे. 


फेब्रुवारीमध्ये घडली होती घटना


फेब्रुवारीमध्ये ही घटना घडली होती. यामध्ये पृथ्वी शॉ त्याच्या काही मित्रांसोबत मुंबईतील एक नामांकित हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी सपना गिल देखील तिथे आली होती. तिने पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेतला, यानंतर तिला अजून एक सेल्फी घ्यायचा होता, मात्र यावेळी शॉने नकार दिला. 


शॉने नकार दिल्यानंतर देखील सपना सेल्फीसाठी मागे लागली होती. अखेर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर पृथ्वी शॉच्या मित्राला तक्रारीनंतर पोलिसांनी सपनासोबत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सपना गिलला अटक देखील करण्यात आली. 


पृथ्वी शॉ आणि सपनामध्ये झाली होती बाचाबाची


या प्रकरणाचा एक काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात भांडण झालेलं पहायला मिळालं. शिवाय त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. 


यानंतर पृथ्वी शॉच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभित ठाकूर आणि सपना गिल नावाच्या दोन फॅन्सनी हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या पृथ्वी शॉसोबत सेल्फी घ्यायचा होता. या गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि वाढला देखील. हॉटेलमधून बाहेर येताच सपनाच्या मित्रांनी त्याला घेरून बेस बॉलच्या बॅटने मारहाण देखील केली.