टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. नुकतंच तो गर्लफ्रेंडसोबत कश्मिरला गेल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता वेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर तो गर्लफ्रेंड निधी तापडिया (Nidhi Tapadia)सोबत लग्नबंधनात अडकल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत स्वत: पृथ्वी शॉने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे. या पोस्टनंतर त्याने लग्न केल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. तसेच फॅन्सना त्याला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
हे ही वाचा : शुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ
पोस्टमध्ये काय?
पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) इन्स्टाग्राम अकांऊंटवरून एक स्टोरी शेअर करण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये पृथ्वी आणि निधी तपाडियाचा एकमेकांना किस करतानाचा फोटो आहे.या फोटोच्या कॅप्शनला 'हॅप्पी वॅलेंटाईन माय वाईफ' असे कॅप्शनला लिहिण्यात आले आहेत. यासोबत ही स्टोरी निधीला टॅग करण्यात आली आहे. ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर काही मिनिटांनी ती डिलीट देखील करण्यात आली होती. या स्टोरीनंतर दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
कोणासोबत लग्न केलं?
पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) स्टोरी शेअर केल्यानंतर अनेक क्रिकेटर्स आणि फॅन्सनी ती पाहिली होती. त्यानंतर त्याने ही स्टोरी त्याच्या अकाऊंटवरून डिलीट केली होती. मात्र ही स्टोरी पाहून सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पृथ्वी शॉच्या लग्नाची बातमी लीक झाली आहे. पण प्रश्न असा आहे की पृथ्वी शॉने कोणाशी लग्न केले? पृथ्वी शॉच्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार त्याचे लग्न निधी तापडियाशी (Nidhi Tapadia) झाले आहे. निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नुकतेच पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पृथ्वी शॉ लग्नावर काय म्हणाला?
निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर पृथ्वी शॉने यावर स्पष्टीकरण दिले आहे.पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शे्अर केली आहे. या स्टोरीत त्याने लिहले की, 'कुणीतरी माझे फोटो इडीट करून माझ्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवरून पोस्ट केल्याचे भासवत आहे'. त्यामुळे या स्टोरीकडे आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करा असे आवाहन त्याने फॅन्सना केले आहे.
दरम्यान पृथ्वी शॉचे (Prithvi Shaw) लग्न खरंच झाले नसल्याचे त्याच्या स्पष्टीकरणावरून कळत आहेत. त्याच्या फोटोशी कुणीतरी छेडछाड करून हे कृत्य केल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी पृथ्वी शॉच्या लग्नाची चर्चा आहे.