मुंबई: दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यानंतर पृथ्वी शॉचा फोटो स्टेटसवर ठेवून कायमच चर्चेत राहणाऱ्या त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण पृथ्वी नाही तर तिचा व्हिडीओ आहे. पृथ्वी आणि प्राची सिंह एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र दोघांनीही याबाबत अद्याप अधिकृतपणे मौन बाळगलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉचे फोटो स्टेटसवर ठेवून कधी हार्टचे इमोजी तर कधी सूटकेस घेण्याचे सल्ले देणाऱ्या प्राची सिंहची पुन्हा एकदा चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तिने आपल्या इन्स्टावर बेली डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा डान्स पाहून चाहत्यांनाही भुरळ पडली आहे. प्राची सिंहने बेली डान्स केला आहे. 




उडान या सीरियलमध्ये प्राची सिंहने वंशिकाची भूमिका केली. ती अभिनयासोबत उत्तम डान्स देखील करते. आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टावर तिचे अनेक डान्सचे व्हिडीओ तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 


पृथ्वी आणि प्राची या दोघांच्या खूप चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत मात्र त्याबाबत दोघांनीही मौन बाळगणं पसंत केलं. मात्र प्राची आपल्या सोशल मीडियावर पृथ्वीचे अनेक फोटो आणि त्याच्यासाठी स्टेटस ठेवताना दिसते.