Prithvi Show : भारतीय संघाचा युवा स्टार खेळाडू Prithvi Show मागील काही काळापासून संघातून बाहेर आहे. सिलेक्टर्सने आशिया कपसाठी पृथ्वीचा सिलेक्शन केलं नव्हतं. त्यानंतर T20 World Cupला देखील पृथ्वीला संधी मिळाली नाही. त्यामुळे पृथ्वी सध्या दुलीप ट्राफीमध्ये नशिब चमकवण्याचा प्रयत्न करतोय. अशातच पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये असल्याने गोलंदाजांना घाम फोडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पृथ्वी शॉने धमकेदार शतक ठोकलं. सेमीफायनलच्या दुसऱ्या डावात 108 च्या स्टाईक रेटने 104 धावा ठोकल्या. फक्त 94 बॉलमध्ये पृथ्वीने ही कामगिरी केली. इतर खेळाडू मैदानात विकेट सांभाळू शकत नसताना पृथ्वीने शतक साजरं केलं. या डावात त्याने 11 चौकार तर 3 गगनचुंबी षटकार खेचले. वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन असा हा सामना होता.


दुसऱ्या डावात वेस्ट झोनला फक्त 130 धावा करता आल्या. पृथ्वी शॉच्या शतकीय कामगिरीच्या (Prithvi Show Century) जोरावर वेस्ट झोनला सामन्यात 259 धावांची लीड मिळाली. मॅचचे आणखी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता सेंट्रल झोनच्या बॉटिंगवर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.


पहिल्यांदा फलंदाजी करताना सेंट्रल झोनची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. पहिल्या डावात सेंट्रल झोनने 128 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट झोनने पहिला डावात 257 धावा केल्या होत्या. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीचा बॅट तळपताना दिसत आहे. पृथ्वीने क्वार्टर फायनलमध्ये देखील शतक झळकावलं होतं.