Pro Kabaddi League 2021: कबड्डीचा महासंग्राम अर्थात प्रो कबड्डी लीगला उद्यापासून सुरुवात होत आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये यंदा 12 संघ खेळणार असून ग्रुप स्टेजमध्ये तब्बल 66 सामने रंगणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रो कबड्डी लीग पुढे ढकलण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला सामना कोणत्या संघात?
प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील सलामीचा सामना उद्या बंगळुरू बुल्स आणि यू मुंबा यांच्यात रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ बंगळुरुमध्येच सामने खेळवले जाणार आहेत. सामन्यादरम्यान प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. 


एका दिवसात तीन सामने
आठव्या हंगामाच्या पहिल्या चार दिवशी आणि दर शनिवारी प्रत्येकी तीन सामने खेळवले जाणार आहेत. सातव्या हंगामात टॉप खेळाडू असलेल्या पवनकुमार सेहरावतवर पुन्हा एकदा कबड़्डी प्रेमींच्या नजरा असतील. त्याचबरोबर यंदाच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरलेल्या प्रदीप नरवाल कशी कामगिरी करणार याचीही उत्सुकता आहे. कोरोनामुळे लीगचे काही नियमही बदलण्यात आले आहेत. यंदा सबस्टिट्यूट खेळाडूंची संख्या पाच ठेवण्यात आली आहे.


प्रत्येक सामना 40 मिनिटांचा
सामन्याच्या दिवशी सर्व संघांना संघात किमान 10 आणि जास्तीत जास्त 12 खेळाडू ठेवावे लागणार आहेत. यातएक परदेशी खेळाडू असेल. प्रत्येक सामना फक्त 40 मिनिटांचा असेल. यात 20-20 मिनिटांचे दोन हाफ असतील. दोन हाफ टाईममध्ये पाच मिनिटांचे अंतर असेल. मध्यंतरानंतर दोन्ही संघांच्या बाजू बदलतील. म्हणजेच दोघेही एकमेकांची जागा घेतील.


खेळाडूंना विश्रांतीची वेळ 
सामन्यात दोन्ही संघांना विश्रांतीसाठी 90 सेकंद देण्यात येणार आहेत. ही वेळ कर्णधार, प्रशिक्षक किंवा कोणताही खेळाडू रेफरीच्या परवानगीने घेऊ शकतो. टाइमआउट काळात संघ मैदान सोडू शकत नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास विरोधी संघाला बोनस गुण दिले जातील.


संघ एकदा प्रशिक्षकाशी चर्चा करू शकतील
खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास किंवा इतर कारणाने सामन्यात व्यत्यय आल्यास, मॅच रेफरी ऑफिशियल टाईम आऊट घेऊ शकतो. संघाच्या टाइमआउटपेक्षा हा वेळ अतिरिक्त असेल. सामन्याच्या हाफ टाईम दरम्यान संघाला प्रशिक्षकाशी चर्चा करण्याची एकच संधी दिली जाईल. यासाठी 20 सेकंद दिले जातील.