Bengal Warriorz vs UP Yoddhas in PKL: अतिशय अटीतटीच्या सामन्यात यूपी योद्धाज व बंगाल वॉरियर्स यांच्यातील लढत ३१-३१ अशी बरोबरी सुटली त्यामुळेच प्रो कबड्डी लीग मध्ये आज प्रेक्षकांना खेळाचा निखळ आनंद घेता आला. मध्यंतराला यूपी योद्धाज संघाकडे १५-१३ अशी नाममात्र आघाडी होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही विलक्षण रंगत पाहायला  मिळाली. 


झाला अटीतटीचा सामना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपी योद्धाज संघाने आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामने जिंकले होते तर बंगाल संघाने तेवढ्याच सामन्यांमध्ये फक्त पाचच सामने जिंकण्यात यश मिळवले होते. त्यामुळे आजच्या लढतीत यूपी संघाचे वर्चस्व राहील अशी अपेक्षा होती. मात्र बंगाल वॉरियर्स संघाने त्यांना सुरुवातीपासूनच दमदार लढत दिली.‌ तरीही मध्यंतरापर्यंत युपी योद्धा संघाने आपली आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले. त्यांचा हुकमी चढाईपटू भवानी रजपूत याने या मोसमात चढाईच्या गुणांचे शतक ओलांडले तर त्याचा सहकारी हितेश याने पकडी मधील गुणांचे अर्धशतक साजरे केले.


हे ही वाचा: Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्सने केला प्लेऑफ मध्ये प्रवेश! बंगळुरू बुल्सकडून दमदार लढत, बघा Points Table


 


उत्तरार्धात 'असा' रंगला सामना 


उत्तरार्धात सुरुवातीपासूनच बंगालच्या खेळाडूंनी बरोबरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अखेर २५ व्या मिनिटाला १६-१६  अशी बरोबरी करण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र त्यानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी सतत चढाओढ दिसून आली.‌ सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला बंगाल संघाचा कर्णधार फाजल अत्राचेली याने गगन गौडा त्याची पकड करीत प्रतिस्पर्धी संघावर लोण चढविला आणि संघाला आघाडीवर नेले. मात्र गौडा याने पुढच्या चढाईत तीन गडी बाद करीत सुपर रेडचा मान मिळवला.‌ शेवटची पाच मिनिटे बाकी असताना युपी योद्धा संघाकडे २७-२४ अशी आघाडी होती. एक मिनिट बाकी असताना त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. 


हे ही वाचा: नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच



हे ही वाचा: Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम


 बंगाल कडून प्रामुख्याने प्रणय राणे व नितेश कुमार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.