...जेव्हा धोनीसमोरच आफ्रिदीच्या नावाचा झाला जयजयकार
काही लोकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नुकताच बारामुल्ला जिल्ह्यातील कुनमेर येथे आला.
इंडियन आर्मीने आयोजित केलेल्या चिन्नर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये त्याला विशेष अतिथी म्हणून बोलाविले होते.
धोनीचे फॅन्स मोठ्या संख्येने त्याला भेटण्यासाठी आले होते.
बूम बूम आफ्रिदी
लेफ्टिनंटचे मानद पद मिळालेला धोनी जेव्हा नवोदित खेळाडूंशी चर्चा करत होता तेव्हा हा प्रसंग घडला.यावेळी काही लोकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुम बूम आफरीदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
भारत पाक संबंध
यावेळी ३६ वर्षीय धोनीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. भारताला पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करायला हवेत का? असे यावेळी धोनीला विचारले गेले.
'राजकीय प्रश्न'
जेव्हा आपण क्रिकेटबद्दल बोलतो, बहुतांश जणांच्यामते हा खेळ आहे. पण मुद्दा जेव्हा मालिका खेळविण्याचा येतो तेव्हा त्यापेक्षा बरेच काही आहे. हा एक राजनयिक आणि राजकीय निर्णय देखील आहे. "