वचन दिलं होतं रिकाम्या हाती येणार नाही आणि तो पदक जिंकूनच आला
टोकियो ऑलिंम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणाऱ्या पहेलवान बजरंगने टोकियो येथून आल्यानंतर सगळ्यांचे आभार मानले.
मुंबई : ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीनंतर भारतीय खेळाडू आज भारतात परतले आहेत. देशात पाऊल ठेवताच खेळाडूंसह प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना होती. भारताची मान उंचावणाऱ्या या खेळाडूंच्या यादीत भारताचा पहेलवान बजरंग पुनिया देखील होती. भारतात पोहोचल्यानंतर त्याने म्हटलं की, 'मी वचन दिलं होतं की, मी रिकाम्या हातमी परत येणार नाही.'
टोकियो ऑलिंम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणाऱ्या पहेलवान बजरंगने टोकियो येथून आल्यानंतर सगळ्यांचे आभार मानले. भारताच्या धरतीवर पाऊल ठेवताच त्याने धरतीला नमन केलं. चार ही बाजुंनी चाहते चिअर्स करत होते.
बजरंगने म्हटलं की, मी माझं वचन पूर्ण केलं. ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाती माघारी नाही आलो. पदक घेऊन देशात परतलो. एअरपोर्टवर उपस्थित लोकांना त्याने कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्याचं आवाहन केलं.
बजरंगने 65 किलो गटात फ्रीस्टाइल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. पण अजरबैजानच्या हाजी अलीएवकडून त्याचा 5-12 ने पराभव झाला. पऱाभवानंतर ही कांस्य पदकाच्या सामन्यात त्याने पुन्हा चांगली कामगिरी केली. त्याने कझाकिस्तानच्या नियाजबेकोवचा 8-0 ने पराभव केला.
बजरंगने एअरपोर्टवर म्हटलं की, 'मला नाही माहित मी काय आहे. मला लोकांनी जे प्रेम दिलं. ते व्यक्त करणं कठीण आहे. मी प्रत्येकाचे आभार मानतो. सगळ्यांनी काळजी घ्या.'