Pakistan Player Called Fixer By Fans: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद आमीरसारखा गोलंदाज यापूर्वी कधी पाहिला नाही असं अनेकांनी म्हटलं होतं. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या मोहम्मद आमीरने त्याचं कौशल्य आणि एकटाच्या जीवावर समाना पालटण्याची क्षमता दाखवून दिली होती. मात्र आपल्या करिअरच्या टॉपवर असतानाच मैदानाबाहेरच्या एका घटनेमुळे मोहम्मद आमीर मैदानापासून दूर फेकला गेला. 2010 मध्ये मोहम्मद आमीरला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुद्दाम 2 नो बॉल टाकल्याप्रकरणी मोहम्मद आमीरला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याला यासाठी 3 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र या साऱ्यातून सावरत त्याने 2015 मध्ये पुनरागमन केलं. त्याच्या पुढल्या वर्षी तो पुन्हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातून खेळू लागला.


त्याला फिक्सर म्हणाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये मोहम्मद आमीर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर वर्षभरात तो सर्व प्रकारच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र तो आजही फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धा खेळतो. मात्र आजही त्याच्यावर ठेवण्यात आलेला स्पॉट फिक्सिंगचा ठपका छळत असल्याचं नुकतेच दिसून आले. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानी प्रेक्षक मोहम्मद आमीर मैदानात जात असताना त्याला 'फिक्सर' म्हणून डिवचताना दिसतात. 


मोहम्मद आमीर यावर काय म्हणाला?


पाकिस्तान सुपर लीगमध्ये द क्वोटा ग्लॅडीएटर्ससाठी खेळणाऱ्या मोहम्मद आमीरला 'फिक्सर' नावाने संबोधल्याचं लक्षात येईपर्यंत तो पुढे निघून गेला होता. मात्र काही पावलं पुढे गेल्यानंतर आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं लक्षात आल्यावर मोहम्मद आमीर चिडून चाहत्यावर डाफरला. 'घरुन हे शिकून येता का?' असा प्रश्न मोहम्मद आमीरने 'फिक्सर' म्हणणाऱ्या चाहत्याच्या दिशेने पाहत विचारला.



कुटुंबाला मैदानाबाहेर काढल्याचा दावा


मोहम्मद आमीर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना पहिल्या 6 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मोहम्मद आमीरने मुल्तानच्या उपायुक्तांवर कुटुंबाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. सामना सुरु असताना माझ्या कुटुंबियांबरोबर गैर्तवणूक करत त्यांना मैदानाबाहेर काढण्यात आल्याचं मोहम्मद आमीर म्हणाला. ही अशी वर्तवणूक सहन करण्यापलीकडची असून या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी आमीरने केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी मोहम्मद आमीरने त्याला मुल्तानच्या मुख्यमंत्री मर्याम शरीफ यांचा फोन आला आणि त्यांनी या प्रकरणात शंका निरसन केलं. मुल्तानच्या उपायुक्तांनी नेमकं काय घडलं याचा तपशील आपल्याला दिल्याची माहिती मोहम्मद आमीरने ट्वीटरवरुन दिली.