सिडनी टेस्टमध्ये पुजाराने मोडले अनेक रेकॉर्ड्स
पुजाराची दमदार खेळी....
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणाऱ्या पुजाराने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तो दुहेरी शतकपासून थोडा लांब राहिला पण आपल्या जबरदस्त कामगिरीने त्याने अनेकांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक बॉल खेळण्याचा रेकॉर्ड : पुजाराने इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफचा रेकॉर्ड मोडला आहे. सटक्लिफने १९२८ च्या अॅसेज सीरीज दरम्यान ४ सामन्यांमध्ये ७ इनिंगमध्ये १२३७ बॉलचा सामना केला होता. या सीरीजमध्ये ५०.७१ च्या रनरेटने त्यांनी एक शतक आणि २ अर्धशतक केले होते. त्यांनी या सिरीजमध्ये ३५५ रन केले होते. इंग्लंडने ही सिरीज ४-१ ने जिंकली होती.
चार सामन्यांच्या सिरीजमध्ये २-१ ने पुढे असलेल्य़ा भारतीय टीमला पुजाराच्या उत्कृष्ठ खेळीमुळे चागंल्या स्थितीत पोहोचवलं आहे. पुजाराने या सिरीजमध्ये आतापर्यंत ३ शतक ठोकले आहेत. त्याने या सिरीजमध्ये आतापर्यंत ५२१ रन केले आहेत.
पुजाराने अनेक भारतीय खेळाडूंना देखील मागे टाकलं आहे. राहुल द्रविडने याआधी २००३-०४ मध्ये बॉर्डर-गावसकर सिरीजमध्ये १२०३ बॉलचा सामना केला होता. द्रविडनंतर विराट कोहली १०९३ आणि लक्ष्मण ९०६ बॉलसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी होते.
पुजाराने या सिरीजमध्ये ५०० रनचा आकडा देखील गाठला आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीजमध्ये ५०० हून अधिक रन करणारा तो तिसरा भारतीय बनला आहे. हा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. कोहलीने २०१४-१५ मध्ये ६९२ रन केले आहेत. तर राहुल द्रविडने २००३-०४ मध्ये ६१९ रन केले होते.