दुबई : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. 


पुजाराला फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजाराने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत १४३ धावांची शानदार खेळी केली. याचा फायदा चेतेश्वरला झाला. दोन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानावर आलाय. 


भारताचा कर्णधार विराट कोहली चेतेश्वरच्या ११ स्थानांनी मागे आहे. क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर आहे. कोहलीने ६२व्या कसोटीत दुसरे शतक ठेवले. 


ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह अव्वल


दुसरीकडे अॅशेज मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद शतक ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ अंकांसह अव्वल स्थानावर आहे. 


इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट तिसऱ्या आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन्स चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर सहाव्या स्थानावर आहे. 


इतरांची घसरण


भारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजय २८व्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा या क्रमवारीत ४६व्या स्थानी आहे. लोकेश राहुल नवव्या, अजिंक्य रहाणे १५व्या स्थानी तर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने १८व्या आणि शिखर धवन २९व्या स्थानावर घसरलेत.


गोलंदाजीतील क्रमवारीत रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. तर मिशेल स्टार्क १०व्या स्थानावर आहे.