लिसेस्टर :  मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे.  विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीला स्मृती मानधनाची विकेट गेल्यावर सावध पवित्रा घेत कर्णधार मिथाली राजसह खेळताना पूनमने ११ चौकारासह आपले शतक साजरे केले.  १२९ चेंडूत तिने शतक झळकावले. 


पूनम १०६ धावांवर बाद झाली, हिची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याच्या नावावर २ अर्धशतक आणि  पहिले शतक आहे. 


पूनम ठरली वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी पाचवी 


पूनम राऊत ही वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी पाचवी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी याच वर्ल्ड कपमध्ये स्मृती मानधनाने १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ चेंडूत १०६ धावांची खेळी केली.  वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी ती चौथी भारतीय ठरली होती. 


यापूर्वी हरमनप्रीतने इंग्लड विरूद्ध २०१३ च्या वर्ल्ड कपमध्ये नाबाद १०७ धावा केल्या होत्या. मिताली राजने याच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध १०३ धावांची नाबाद खेळी केली होती.  तर टी कामिनी हिने याच वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध १०० धावांची खेळी केली होती.