हरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर
भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय.
नवी दिल्ली : भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये केलेल्या कामगिरीसाठी हरमनप्रीतला ही नोकरीची ऑफर दिलीय. त्याचप्रमाणे तिला 5 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय.
सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीतनं 115 बॉल्समध्ये नॉटआऊट 171 रन्सची इनिंग खेळली होती. त्याचप्रमाणे फायनलमध्येही तिनं 51 रन्सची झुंजार खेळी केली होती.