मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १६६ रन्स केल्या आहेत. दिल्लीकडून कॅप्टन गौतम गंभीरनं सर्वाधिक ५५ रन्स केल्या. पण इतर कोणत्याही बॅट्समनना मोठी खेळी करता आली नाही. ऋषभ पंतनं १३ बॉलमध्ये २८ रन्स तर क्रिस मॉरिसनं १६ बॉलमध्ये नाबाद २७ रन्स केले.


पंजाबच्या मोहित शर्मा आणि मुजीब-उर-रहमाननं प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या तर अश्विन आणि अक्सर पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा