नवी दिल्ली : मंगळवारी पंजाब आणि राजस्थानच्या टीममध्ये रंगतदार सामना झाला. या सामन्या इतकीच चर्चा झाली ती लोकेश राहुलच्या खेळाची. पंजाबकडून खेळणारा लोकेश भिंतीप्रमाणे उभा राहून बॅटींग करत होता. १४ रन्सवर गेल आऊट झाला. त्यानंतर पटापट सहा विकेट गेल्या. बघता बघता ८१ रन्सवर ६ विकेट गेल्या होत्या. पण पंजाबची बाजु लोकेश राहुलने अडवून धरली होती. तो शेवटच्या बॉलपर्यंत थांबून राहिला. त्याने ७० बॉलमध्ये २ सिक्स आण ११ फोर मारत ९५ रन्सची शानदार खेळी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबची टीम २० ओव्हरमध्ये ७ विकेटनंतर १४३ रन्सच बनवू शकली.  टीमची मालकीण प्रिती झिंटाने गळाभेट करून राहुलला शाबासकी दिली. पण राहुलच्या चेहऱ्यावर कोणता आनंद नव्हता. 

खराब रेकॉर्ड


आयपीएलमध्ये सर्वात मोठी नाबाद खेळी करूनही मॅच हरण्याचा रेकॉर्ड राहुलच्या नावे झालाय. त्याने ८ वर्षापूर्वी नमन ओझाने बनवलेला रेकॉर्ड तोडलाय. 

 

सर्वात मोठी नाबाद खेळी खेळूनही संघाला विजय न मिळवून देणारे खेळाडू 

 

लोकेश राहुल- वि. राजस्थान - जयपूर २०१८ - ९५ नाबाद 

 

नमन ओझा - वि. चेन्नई - चेन्नई २०१० - ९४  नाबाद 

 

विराट कोहली - वि. मुंबई इंडियन्स - मुंबई २०१८ - नाबाद ९२