मुंबई : यंदाच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून बॅडमिंटनपटू  पी.व्ही सिंधू तिच्या गुरूंना डिजिटल फिल्मच्या माध्यमातून गुरूदक्षिणा देणार आहे. 
    एका उत्पादनाची ब्रँड अँबेसेडर असलेली  पी.व्ही सिंधू प्रथमच सिनेमाच्या निर्मितीक्षेत्रात सहनिर्माती म्हणून पाऊल ठेवणार आहे. सिंधूचे कोच पुलेला गोपीचंद यांना गुरूदक्षिणा म्हणून ही अनोखी भेट देण्याचा सिंधूचा मानस आहे. 
 #IHateMyTeacher असं या डिजिटल फिल्मचे नाव असून आपल्या आवडत्या व्यक्तीवरही थोडसं रागवणं कसं योग्य आहे ? अशा आशयावर ही फिल्म आधारित आहे. 
 शिष्याला घडवताना शिक्षकाला त्याच्या भल्यासाठी प्रसंगी कठोर व्हावे लागते. कलांतराने या या मेहनतीचे रूपांतर यशामध्ये होते. 'या शिक्षकदिनाला मी मिळवलेले सारे यश माझ्या गुरूला अर्पण करणार आहे.' असे सिंधूने सांगितले आहे. 
 एका सामान्य हैदराबादी मुलगी ते यशस्वी खेळाडू या प्रवासामधील कहाणी या चित्रपटामधून उलगडणार आहे.