सिंगापूर : ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. सिंधूने रविवारी सिंगापूर ओपन 2022 मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यी हिचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. या विजयासह तिने इतिहास रचलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या साइना कावाकामीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. सिंधूने उपांत्य फेरीत 21-15, 21-7 अशा फरकाने सहज विजय मिळवला होता. जपानी स्टार कावाकामी एकदाही सिंधूवर भारी पडताना दिसली नाही.


सिंधूसाठी जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर असलेल्या वांग जी यीला पराभूत करणं सोपं नव्हतं. तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात सिंधूने विजयाने सुरुवात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये चीनचा खेळाडू वांगचा 21-9 असा पराभव केला. त्यानंतर वांगने कमबॅक करत दुसरा सेट 21-11 असा जिंकून सामना बरोबरीत आणला.



तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीच्या 8-10 गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत होती. पण पीव्ही सिंधूने हळूहळू सामन्यात पकड घेत तिसरा सेट 21-15 अशा फरकाने जिंकला आणि विजेतेपद पटकावलं.