नवी दिल्ली : प्येईंगचांग येथे होणाऱ्या विंटर ऑलिम्पीकची तयारी पूर्ण झाली असून, ८ फेब्रूवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. स्पर्धेदरम्यान पुरूष आणि महिला खेळाडूंसाठी प्रत्येकी ३७ कंडोम देण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंना समान कंडोम मिळावेत याची कटाक्षाने काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कंडोम (पुरूष आणि महिलांसाठी) मागविण्यात आले आहेत.


९२ देशांचे तब्बल २९५२ खेळाडू सहभाग घेणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंटर ऑलिम्पीकमध्ये एकूण ९२ देशांचे तब्बल २९५२ खेळाडू सहभाग घेणार आहेत. उत्तर कोरियाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे स्पर्धेचे आयोजक दक्षिण कोरियाने उभय देशातील वादाची पार्श्वभूमी विचारात घेता उत्तर कोरियाच्या खेळाडूंवर विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या सोई-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कसर राहणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.


मागणीनुसार कंडोमचा पुरवठा वाढणार


दरम्यान, स्पर्धेदरम्यान कंडोमचे वाटप हा चर्चेचा विषय ठरला होता. कारण, आलिम्पीक प्रशासनाने अधिकृतरित्या दिलेल्या प्रतिक्रियेत या वेळी कंडोमची संख्या वाढविण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, १४ फेब्रुवरीला व्हॅलेंटाईन डे ये आहे. त्यामुळे कंडोमचा खप वाढून तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. प्रत्येक खेळाडूच्या बाथरूममध्ये हे कंडोम ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, मागणी वाढल्यास कंडोमचा पुरवठाही वाढविण्याचे सुतोवाच प्रशासनाने दिले आहेत.


तेव्हा, वाटले ३४ लाख कंडोम


दरम्यान, २०१६ मध्ये पार पडलेल्या रियो ऑलिम्पीकदरम्यान तब्बल ३४ लाख कंडोम वाटण्यात आले होते. त्या वेळी प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला ४२ कंडोम आलो होते.