IPL : सध्याचा काळ असा आहे, की चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये असणारं नातं फार मोठ्या फरकानं आणि फार वेगानं कमी होत आहे. सोशल मीडियाचा वापर यासाठी कारणीभूत ठरत आहे. सेलिब्रिटी म्हटलं, की त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आल्याच. अशाच एका स्टार (Cricket) क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्यानं सध्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा वळवल्या आहेत. जगभरात आपल्या खेळामुळं प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाडूनं स्वत:ला माध्यमं आणि प्रसिद्धीपासून कितीही दूर ठेवलं असलं तरीही Love Story मुळं मात्र तो बराच चर्चेत आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू म्हणजे, दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक अर्थात विकेट किपर क्विंटन डि कॉक (Quinton de Kock) . 2015 मध्ये त्यानं साशा हार्ली  (Sasha Hurly) शी साखरपुडा केला आणि 2016 मध्ये त्यानं तिच्याशी लग्नगाठ बांधली. 



साशा एक चिअरलीडर (cheerleader) होती, IPL मध्येही ती बऱ्याचदा दिसली होती. क्विंटन आणि तिची पहिली ओळखही आयपीएल सामन्यांदरम्यानच झाली होती. 2012 मध्ये एका आपीएल सामन्यामध्ये क्विंटननं साशाला पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिथे खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळत असतानाच क्विंटन मात्र भलतीकडेच क्लिन बोल्ड झाला होता. 




सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्यांच्याच बोलणं सुरु झालं. पुढे ते एकमेकांचे खूप चांगले मित्र ठरले. ही मैत्री आणखी घट्ट झाली, पाहता पाहता त्यांच्या प्रेमाच्या नात्याची सुरुवात झाली. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


पाहा : Asia Cup 2022: MS Dhoni बनला पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण, कसं ते जाणून घ्या...


क्विंटनशी लग्न करणारी साशा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. भटकंतीची तिला विशेष आवड. पतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिला बऱ्याचदा क्रिकेट सामन्यांदरम्यान पाहिलंही गेलं आहे. एकिकडे क्विंटनच्या या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे त्याचा चेहरा इशान किशनशी मिळताजुळता असल्यामुळं या मुद्द्यावरूनही बरीच चर्चा पाहायला मिळते. कित्येकजण तर, त्या दोघांमध्ये बाचकतातसुद्धा.