मुंबई : आयपीएल २०१९ साठी मुंबईच्या टीमनं आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डी कॉक या मोसमात मुंबईकडून मैदानात उतरेल. मागच्या मोसमात तो विराटच्या बंगळुरूकडून खेळला होता. बंगळुरूनं क्विंटन डी कॉकला २.८ कोटी रुपयांना मुंबईला विकलं आहे. याच किंमतीला बंगळुरूनं डी कॉकला लिलावात विकत घेतलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्विंटन डी कॉकला टीममध्ये घेतल्याच्या बदल्यात मुंबईनं बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमान (२.२ कोटी रुपये) आणि श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकिला धनंजया (५० लाख रुपये) यांना सोडून दिलं आहे.


मुंबईच्या टीममध्ये सध्या इशान किशन, आदित्य तरे हे दोन विकेट कीपर आहेत. पण क्विंटन डी कॉकचा वापर मुंबईची टीम ओपनर म्हणून करू शकते. आगामी मोसमात क्विटंन डी कॉक वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईससोबत ओपनिंगला दिसू शकतो.


क्विटंन डी कॉक दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूकडून खेळला आहे. आयपीएलच्या ३४ मॅचमध्ये त्यानं २८.०९ ची सरासरी आणि १३० च्या स्ट्राईक रेटनं ९२७ रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.


१५ नोव्हेंबर ही आयपीएलच्या टीमना खेळाडूंना सोडण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी सगळ्याच फ्रॅन्चायजी त्यांच्या टीममध्ये बदल करताना दिसतील. याची पहिली सुरुवात मुंबईनं केली आहे.