R Ashwin 38th Birthday : भारताचा अनुभवी दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आज 17 सप्टेंबर रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनचा जन्म हा 1986 मध्ये चेन्नई येथे झाला होता. अश्विनने आपल्या गोलंदाजीने भारतासाठी अनेक महत्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या, अनेक सामन्यात तो गेमचेंजर देखी ठरला. अश्विन भारतासाठी क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळला असून सध्या तो भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसून येतो. अश्विन भारताच्या श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. 


किती आहे आर अश्विनची एकूण संपत्ती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


स्पोर्ट्सकीड़ाच्या रिपोर्ट्सनुसार, भारताचा स्टार गोलंदाज असलेल्या आर अश्विनची एकूण संपत्ती ही जवळपास 132 कोटी इतकी आहे. आर अश्विन भारतीय संघासह आयपीएलमध्ये सुद्धा खेळतो. अश्विनकडे बीसीसीआयचं ग्रेड ए चं वार्षिक कॉन्ट्रॅक्ट आहे. याद्वारे त्याला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अश्विनला 5 कोटी रुपये मिळतात. यापूर्वी पंजाब अश्विन पंजाब किंग्सकडून खेळला होता यावेळी त्याला एका आयपीएल सीजनसाठी 7.6 कोटी रुपये मिळाले होते. 2008 मध्ये अश्विनने आयपीएलमध्ये डेब्यू केले होते यातून त्याने आतापर्यंत 82 कोटी रुपये कमावले आहेत. रविचंद्रन अश्विनची मासिक कमाई ही जवळपास 50 लाख असल्याचं सांगण्यात येत. 


हेही वाचा : पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...


 


आर अश्विन जाहिरातींमधूनही करतो मोठी कमाई : 



आर अश्विन अनेक कंपन्यांचा ब्रँड अम्बॅसिडर आहे. अश्विन मिंत्रा, बोम्बे शेविंग कंपनी, मान्ना फूड्स, एरिस्टक्रेट बॅग्स, ओप्पो, मूव, स्पेक्समेकर्स, कोक स्टूडियो तमिल, आणि ड्रीम 11 के सारख्या ब्रँडला एंडोर्स करतो. तसेच त्याची पत्नी प्रीति नारायणनच्या इंस्टाग्रामवर लिहिलेल्यानुसार अश्विन जेन-नेक्स्ट क्रिकेट अकॅडमीचा मेंटॉर सुद्धा आहे. अश्विन एक मीडिया आणि इव्हेंट कंपनी सुद्धा चालवतो ज्याचे नाव कॅरम बॉक्स असे आहे. 


आलिशान घर आणि लग्झरी कार : 



आर अश्विननचं चेन्नईमध्ये आलिशान घर असून तेथे तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. या घराची किंमत जवळपास 9 कोटी रुपये आहे. टाइम्स नाउच्या माहितीनुसार अश्विनकडे ऑडी Q7 (93 लाख रुपये) आणि रॉल्स रॉयस (6 करोड़ रुपये) या लग्झरी कार आहेत.