पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 17, 2024, 01:09 PM IST
पाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...   title=
(Photo Credit : Social Media)

Champions One Day Cup : भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची फॅन फॉलोईंग खूप मोठी असून त्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स गर्दी करत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे. महत्वाची गोष्ट अशी की यावेळी पाकिस्तानच्या नॅशनल टीमचे स्टार क्रिकेटर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान हे दोघे मैदानात होते. 

पाकिस्तान क्रिकेट टीमचा फलंदाज बाबर आझमचं होम ग्राउंड असलेल्या फैसलाबाद येथे चॅम्पियन्स वनडे कपचा चौथा सामना खेळवण्यात आला. हा सामना स्टॅलियंस आणि मार्खोर्स यांच्यात खेळवण्यात आला, यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सारखे खेळाडू सहभागी होते.  सामन्याच्या पहिल्या इनिंग दरम्यान मेहरान मुमताज 29 वी ओव्हर टाकत होता तेव्हा मार्खोर्सचे फलंदाज  सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद क्रीजवर होते. तिसऱ्या बॉलवर सलमानने चौकार ठोकला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेल्यावर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. तेव्हा कॅमरा हा एका प्रेक्षकावर फोकस करण्यात आला, त्याने विराटची जर्सी हातात पकडली होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा कहर, एकाच सामन्यात 9 विकेट.. टीम इंडियाचे दरवाजे उघडणार? 

 

पाकिस्तानात सुद्धा विराट कोहलीची क्रेज : 

विराट कोहलीची क्रेज पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. पाकिस्तानी चाहते अनेकदा भारत- पाकिस्तान सामन्यातही विराटला समर्थक करताना पाहायला मिळतात. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही कबूल केले आहे की, पाकिस्तानचे लोक विराट कोहलीवर खूप प्रेम करतात. अनेकदा चाहते सोशल मीडियावर बाबर आझम आणि विराट कोहली यांची तुलना करताना दिसतात. 

बाबर आझमचा खराब फॉर्म : 

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम मोठी धावसंख्या करण्यात फ्लॉप ठरला. फक्त फॅन्सच नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी देखील त्याच्यावर टीका केली. त्यामुळे सध्या आपल्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी बाबर आझम मेहनत घेत असून यात त्याने चॅम्पियन्स वनडे कपमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. यात त्याने एक अर्धशतक करून एकूण 121 धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याने 76 धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने 45 धावा केल्या.