Live सामना सुरु असताना अश्विन बनला फुटबॉलर; Rohit Sharma ला हसू आवरेना!
अश्विनने केलेली एक कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
सिडनी : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाने आज नेदरलँड्सचा पराभव केला. या विजयाने टीम इंडियाने स्पर्धेतील आपला दुसरा सामना जिंकला. या सामन्यात अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चांगली गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 21 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या. यादरम्यान अश्विनने केलेली एक कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.
झालं असं की, अश्विनच्या चौथ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. यावेळी नेदरलँडच्या फलंदाजाने अश्विनने बॉल टाकल्यावर सरळ शॉट खेळला. यावेळी हा शॉट नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या फलंदाजाच्या दिशेने गेला. याठिकाणी नेदरलँड्सला एक रन घेणं शक्य होतं. मात्र यादरम्यान अश्विनने एक रन वाचवण्यासाठी पायाने फुटबॉलसारखा बॉल मारला आणि तो थेट रोहित शर्माच्या दिशेने आणला.
मुख्य म्हणजे अश्विनच्या हुशारीमुळे नेदरलँडच्या फलंदाजांना एकही रन घेता आला नाही. एकंदरीत अश्विनच्या हुशारीने एक रन वाचला. अश्विनने केलेलं हे कृत्य पाहून रोहित शर्माला देखी हसू आवरलं नाही.
टीम इंडियाचा विजय
टी20 वर्ल्ड कपमधील दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे.नेदरलँडचा (Netherland) 56 धावांनी पराभव करत टीम इंडियाने (Team India) हा दुसऱा सामना जिंकला आहे. हा सामना जिंकत 4 गुणांसह टीम इंडिया पॉईंटस् टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे.
टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या नेदरलँडची (Netherland) सुरुवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजी समोर नेदरलँडचे बॅटसमन जास्त काळ क्रिझवर टिकू शकले नाही. आणि एका मागून एक विकेट पडायला सुरुवात झाली. नेदरलँडच्या एकाही बॅटसमनला 20 ही धावसंख्या देखील गाठता आली नाही.
टीम इंडियाकडून (Team India)अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 विकेट घेतले, तर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनीही 2-2 विकेट घेतल्या. अखेरीस नेदरलँड्सला 9 गडी गमावून 123 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाने 56 धावांनी नेदरलँड्सचा पराभव केला. टीम इंडियाचा फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांनी विजयात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींग करत 2 विकेट गमावून 179 धावा केल्या होत्या. विराटच्या 62, रोहितच्या 53 आणि सुर्यकुमार यादवच्या 51 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या उभारली होती.